4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 16 June 2021
पनवेलमध्ये या गैरव्यवहाराविरोधात काही महिन्यांपूर्वी मोर्चे काढण्यात आले होते. विवेक पाटील यांच्या धोरणामुळे ठेवीदार संकटात सापडले होते. ईडीने या कारवाई दरम्यान पाटील यांच्या घराचीही झाडाझडती घेतल्याची सूत्रांची माहिती आहे
कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. ईडीने विवेक पाटील यांना त्यांच्या पनवेल येथील घरातून ताब्यात घेतलं आहे. या गैरव्यवहारात मनीलाँड्रींग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पनवेलमध्ये या गैरव्यवहाराविरोधात काही महिन्यांपूर्वी मोर्चे काढण्यात आले होते. विवेक पाटील यांच्या धोरणामुळे ठेवीदार संकटात सापडले होते. ईडीने या कारवाई दरम्यान पाटील यांच्या घराचीही झाडाझडती घेतल्याची सूत्रांची माहिती आहे
कर्नाळा बँकेत 650 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा उघडकीस आल्यानंतर बँकेच्या व्यवहारांवर मर्यादा आली होती. ठेवीदार आणि खातेधारकांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावे यासाठी पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी खातेदार आणि ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला होता. बँकेच्या विरोधात ठेवीदारांसोबत आंदोलनही केले होते.