4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 27 June 2021

| Updated on: Jun 27, 2021 | 8:28 AM

सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांचे आर्थिक व्यवहार तपासायला सुरुवात केली आहे. यादरम्यान देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांनी कोलकाता येथील एका कंपनीत मोठी गुंतवणूक केल्याचं समोर आलं आहे

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या कथित वसुलीप्रकरणी सीबीआयने देशमुखांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय याप्रकरणी ईडीची देखील चौकशी सुरु आहे. या प्रकरणातील सर्व घडामोडी आता वेगाने घडताना दिसत आहेत. या घडामोडी सुरु असतानाच आता देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ करणारी बातमी समोर आली आहे. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांचे आर्थिक व्यवहार तपासायला सुरुवात केली आहे. यादरम्यान देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांनी कोलकाता येथील एका कंपनीत मोठी गुंतवणूक केल्याचं समोर आलं आहे

Published on: Jun 27, 2021 08:28 AM
OBC Reservation | ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक; आरोप-प्रत्यारोप?
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 27 June 2021