4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 8 PM | 2 July 2021
ईडीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. सीआयडीने चौकशी केली त्याच्यातून काही निष्पन झालं नाहीय, सगळीकडून पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आहेत. त्यासंदर्भात ज्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जायचं आहे तिकडे जाणार, वकिलांचा सल्ला घेऊन अपिलामध्ये जाऊ, असं अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीनं केलेल्या कारवाई संदर्भात भूमिका स्पष्ट केली. अजित पवार म्हणाले, आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो सुंदरबाग सोसायटीने याचिका दाखल केली होती. 14 कारखान्यांमध्ये जरंडेश्वर कारखाना होता. सर्व रीतसर परवानग्या घेतल्या होत्या, माझ्याच नातेवाईकांचा तो कारखाना आहे. ईडीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. सीआयडीने चौकशी केली त्याच्यातून काही निष्पन झालं नाहीय, सगळीकडून पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आहेत. त्यासंदर्भात ज्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जायचं आहे तिकडे जाणार, वकिलांचा सल्ला घेऊन अपिलामध्ये जाऊ, असं अजित पवार म्हणाले.
ईडीची गुरु कमोडिटीज संदर्भात चौकशी चालवली आहे. त्यामुळे जरंडेश्वर कारखान्यावर टाच आणली आहे. मात्र, सध्या जरंडेश्वर शुगर मिल कंपनी कारखाना चालवते. सीआयडी, एसीबीनं चौकशी केली त्यामध्ये काहीही समोर आलं नाही. ईओडब्ल्यूकडून चौकशी सुरु आहे. ती चौकशी अंतिम टप्प्यात आहे. यासंदर्भात आरोप करण्यात आले होते पण त्यासंदर्भात पॉझिटिव्ह निकाल आले आहेत.