जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी दिसला बिबट्या या बातमीच्या अपडेटसह पहा सुपरफास्ट 50 न्यूज
दिवाळीचा सण आता काही दिवसांवरच आला असतानाच सामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर तूर,मुग आणि उडीत डाळीचे दर वाढले आहेत. तर तूरिच्या डाळाची किंमत चार ते पाच रूपयांनी वाढली आहे.
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. तर आज पुण्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर पुण्यापाठोपाठ सिंधुदुर्गातही पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे भातशेतीला फटका बसण्याची शक्यता आहे. चंद्रपुरातही जोरदार पाऊस झाल्याने अनेक नागरिकांची तारांळ उडाली. तर दिवाळीचा सण आता काही दिवसांवरच आला असतानाच सामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर तूर,मुग आणि उडीत डाळीचे दर वाढले आहेत. तर तूरिच्या डाळाची किंमत चार ते पाच रूपयांनी वाढली आहे. दरम्यान कोल्हापूरच्या जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी पुन्हा एकदा बिबट्याने दर्शन दिलं आहे. सतत बिबट्या दिसत असल्याने भागात भीती पसरली आहे.
Published on: Oct 10, 2022 05:38 PM