नागपूर-उमरेड रोडवर भीषण अपघात, 7 जण ठार, 1 जखमी
तवेरा गाडी ओव्हरटेक करत असल्यामुळे अपघात झाला आहे. विशेष म्हणजे या अपघातात एक चिमुकली बचावली आहे. तिच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
नागपूर – नागपूर (Nagpur) उमरेड रोडवर भीषण अपघात झाला आहे. त्या अपघातामध्ये सात जण जागीचं मृत्यू झाला आहे. भरधाव तवेरा (Tavera) गाडी ट्रकवर आदळल्याने हा अपघात झाला आहे. सात मृतांमध्ये सहा महिला एका पुरुषाचा समावेश आहे. तर एकजण जखमी झाला आहे. उमरेडवरुन नागपूरला येताना उमरगाव (Umargaon) फाट्याजवळ रात्री 10 वाजता अपघात झाला आहे. तवेरा गाडी ओव्हरटेक करत असल्यामुळे अपघात झाला आहे. विशेष म्हणजे या अपघातात एक चिमुकली बचावली आहे. तिच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरु आहेत.