मुंबईकरांची चिंता मिटली, मात्र एक आठवड्याची वाट पहावीच लागणार? महापालिकेनं का घेतला असा निर्णय

| Updated on: Jul 31, 2023 | 8:21 AM

सध्या मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा भातसा, विहार व तुळशी या सात धरणात 74 टक्के पाणीसाठी झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

मुंबई, 31 जुलै 2023 | गेल्या आठवड्यात मुंबईकरांसाठी चांगली बातमी आली होती. त्यामुळे मुंबईत राहणारे अनेक नागरिकांना दिलासा मिळाला होता. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही धरणं 68 टक्यांपेक्षा अधिक भरली होती. त्यामुळे सध्या सुरू असणाऱ्या पाणी कपातीवर लवकरच निर्णय होण्याची शक्यता होती. तर याच आठवड्यापासून पाणीकपात होणार होती. मात्र आता हा लगेच निर्णय होणार नसल्याचं मुंबई महानगरपालिकेकडून कळत आहे. सध्या मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा भातसा, विहार व तुळशी या सात धरणात 74 टक्के पाणीसाठी झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाणीकपातीबाबत महापालिका प्रशासनाची बैठक होईल त्यात आढावा घेतल्यानंतरच पाणीकपातीवर निर्णय होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता आणखीन एक आठवडा वाट पाहावी लागणार आहे.

Published on: Jul 31, 2023 08:21 AM
अजित पवार यांच्या बंडामागे शरद पवार यांची खेळी? पाहा काय म्हणाले अभिजीत बिचुकले?
विकेन्डला अशोका धबधब्यावर ‘ओव्हरफ्लो’ गर्दी, प्रशासनाच्या ‘त्या’ निर्णयानं हौशी पर्यटकांचा हिरमोड