महाबळेश्वरच्या तापोळा -देवळी मार्गावर अचानक खड्डा पडला आणि कार गेली, मग …

| Updated on: Jul 27, 2024 | 5:05 PM

महाबळेश्वरच्या तापोळा -देवळी मार्गावर अचानकजमीन धसल्याने खड्डा पडून त्यात कार अडकल्याचा प्रकार घडला आहे. यानंतर मत्प्रयासाने या कारला जेसीपीच्या मदतीने खड्ड्यातून कसबसे काढण्यात यश आले आहे.

गेले काही मुंबई कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भात मोठी पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. पुण्यात मुळा नदीत खडकवासला धरणाचे पाणी सोडल्याने सिंहगड तसचे विश्रांतवाडीतील भारत नगर तसेच अन्य परिसर पाण्याखाली गेला. त्यामुळे अनेक अपघात घडले आहेत. पुण्यात वीजेचा धक्का बसून तिघा जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तर ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने पुणे ते रायगड हा महामार्ग बंद झाला होता. रस्त्यावरील माती हटविण्यानंतर अनेक तासांनी येथील वाहतूक सुरळीत झाली आहे. तसेच सातारा घाटमाथ्यावर देखील मोठा पाऊस झाल्याने महाबळेश्वरच्या तापोळा -देवळी मार्गावर अचानक खड्डा तयार होऊन त्यात महिंद्र कंपनीची एक कार आत गेल्याची घटना घडली. अखेर जेसीपीच्या मदतीने ही कार खड्ड्यातूून बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. मात्र कारच्या बोनेटला प्रचंड नुकसान झाले आहे.

 

 

 

Published on: Jul 27, 2024 04:59 PM
‘लाडकी सून योजना’ सुरु करा, किरण वळसे-पाटील यांचा घरचा आहेर
भ्रष्टाचारांचे सरदार टीकेला ‘तडीपार’नं प्रत्युत्तर, अमित शहा vs शरद पवारांमध्ये वार-पलटवार