संभाजी भिडे यांच्यासह 150 जणांवर पुण्यात गुन्हा दाखल, आता नेमकं काय केलं?

| Updated on: Sep 04, 2023 | 10:34 PM

शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यासह १५० जणांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी वाद्ग्रस्त विधान केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यात आणखी एका गुन्ह्याची भर पडली आहे.

पुणे : 4 सप्टेंबर 2023 | शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यासह 150 जणांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संभाजी भिडे, राजेंद्र आव्हाळे, राहुल उंद्रे, बाळासाहेब नेवाळे यांच्यासह 150 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी रितेश नाळे यांनी या संदर्भात लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. नगर रस्त्यावरील मांजरी कोलवडी गावात माऊली लॉन्स येथे संभाजी भिडे यांची शनिवारी सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारली होती. पण, पोलिसांची परवानगी नसतानाही संभाजी भिडे यांनी सभा घेतली. त्यामुळे विनापरवाना सभा घेणं त्यांना भोवलं आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी भिडे यांच्यासह 150 जणांविरुद्ध गुन्हा पोलिसांनी परवानगी नाकारली असताना सभेचे आयोजन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला.

Published on: Sep 04, 2023 10:34 PM
‘आमदारकीला लाथ मारतो’, अजित पवार गटाच्या आमदाराच्या रागाचा पारा का चढला?
बच्चू कडू यांच्याकडे कोणत्या जातीचं प्रमाणपत्र? जरांगे यांच्या भेटीदरम्यान सांगितली ‘अंदर की बात… ‘