वीज कोसळून नारळाच्या झाडाने घेतला पेट
नारळाच्या झाडावर वीज कोसळून आग लागल्याने या घटनेची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगली होती. या घटनेत झाडाचे नुकसान झाले असून झाडाच्या वरच्या भाग जळून खाक झाला आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दासगाव मोहल्लामध्ये नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने नारळाच्या झाडाला आग लागली. झाडाला आग लागली असली तरी यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. दासगाव मोहल्ला येथे काल विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत होता, त्यावेळी अचानक नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने झाडाने पेट घेतला. यावेळी झाडाला आग लागताच ही घटना अनेकांनी कॅमेऱ्यामध्ये कैद केली. नारळाच्या झाडावर वीज कोसळून आग लागल्याने या घटनेची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगली होती. या घटनेत झाडाचे नुकसान झाले असून झाडाच्या वरच्या भाग जळून खाक झाला आहे.
Published on: Sep 01, 2022 09:29 AM