मुंबई अहमदाबाद महामार्गावर दिवसागणित अपघात; खड्ड्यामुळे कंटेनर पलटी

| Updated on: Aug 01, 2023 | 10:41 AM

सततच्या आणि जोरदार पडणाऱ्या पावसाचा फटका आता मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला बसत आहे. येथे सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यात खड्यांचे साम्राज्य झाले आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झाल्याची बातमी २७ जुलैरोजी tv9 मराठी ने दिली होती.

पालघर, 01 ऑगस्ट 2023 | मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जनजीनव विस्कळीत झाले आहे. तर सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. ज्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर सततच्या आणि जोरदार पडणाऱ्या पावसाचा फटका आता मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला बसत आहे. येथे सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यात खड्यांचे साम्राज्य झाले आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झाल्याची बातमी २७ जुलैरोजी tv9 मराठी ने दिली होती. त्यानंतरही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. यानंतर मध्येरात्री 1 वाजता सोपारा फाटा येथे खड्ड्यामुळे एक कंटेनर पलटी झाला आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र जीवघेण्या खड्ड्यामुळे वाहनधारक हैराण झाले आहेत. वसई, नालासोपारा, विरार हद्दीत मुंबई अहमदाबाद महामार्गावर वर्सोवा ब्रिज, सासूनवघर, मालजीपाडा, वासमा-या ब्रिज, सातीवली, सोपारा फाटा, विरार फाटा जवळ 3 ते 4 फुटाचे मोठं मोठे खड्डे पडले आहेत. तर खड्ड्यामुळे दिवसाला अनेक अपघात येथे होत आहेत. मात्र हायवे अथोरिटीकाडून हे खड्डे बुजविण्याचे थोडेही सौजन्य दाखविल्या जात नसल्याने वाहनधाराकात तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

Published on: Aug 01, 2023 10:41 AM
“प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा”, रवींद्र धंगेकर यांचा घणाघात
रेल्वेच्या हद्दीतील फलक नागरिकांसाठी धोकादायक, मुंबई मनपाचे रेल्वे प्रशासनाला पत्र