मराठवाड्यातील भक्ताची पंढरपूरच्या विठ्ठलाला 82 तोळे सोन्याची घोंगडी दान
पंढरीच्या विठ्ठलाला दरवर्षी भक्तांकडून विविध स्वरुपाचे दान येत असते. परंतू प्रजासत्ताक दिनाचे औचित्यसाधून विठ्ठलाच्या एका भक्ताने चक्क सोन्याची घोंगडी दान केली आहे. त्यामुळे पंढरीच्या विठ्ठलाला आता सोन्याची घोंगडी परिधान केली जाणार असल्याचे मंदिर समितीने म्हटले आहे.
पंढरपूर | 26 जानेवारी 2024 : पंढरपूरातील विठ्ठलाला अनेक भक्त दरवर्षी दान करीत असतात. यंदा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपुरातील विठूरायाला जालना येथील एका भक्ताने चक्क सोन्याची घोंगडी दान केली आहे. ही घोंगडी 82 तोळ्यांची असून तिची किंमत 55 लाख रुपये आहे. पंढरीच्या विठ्ठलाला पाडव्याला घोंगडी पांघारली जाते. यापूर्वी लोकरीची घोंगडी घातली जायची. आता सोन्याची घोंगडी विठुराला घातली जाणार आहे. या भक्ताने स्वत: चे नाव गुप्त ठेवावे अशी मागणी केली आहे. त्यानूसार त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात आले असल्याचे विठ्ठल मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी म्हटले आहे. या अनामिक भक्ताने गेल्यावर्षीही सोनं दान केलं होते असे म्हटले जात आहे.
Published on: Jan 26, 2024 06:13 PM