धक्कादायक! बीडमध्ये ध्वजारोहणावेळी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

| Updated on: Sep 17, 2022 | 11:22 AM

बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमध्ये आज मराठवाडा मुक्तसंग्राम दिनाचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमामध्ये  ध्वजारोहणावेळी शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.

बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमध्ये आज मराठवाडा मुक्तसंग्राम दिनाचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमामध्ये  ध्वजारोहणावेळी शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.  अंगावर पेट्रोल ओतून शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अनेक दिवसांपासून जमिनीचा वाद प्रलंबित आहे, मात्र त्याबाबत कुठलीच कारवाई होत नसल्याने वैतागलेल्या शेतकऱ्याने ध्वजारोहणावेळी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी या शेतकऱ्याला वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतले आहे.

 

Nanded : ‘पोलीस भरती झालीच पाहिजे!’ देवेंद्र फडणवीसांसमोरच तरुणांची जोरदार घोषणाबाजी, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिवलिंगाची झीज; पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी