रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघावरुन महायुतीत सुंदोपसुंदी सुरु
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावरुन महायुतीत सुंदोपसुंदी सुरु झाली आहे. या मतदार संघातून लढण्याचा दावा भाजपाचे नेते निलेश राणे यांनी केला आहे. तर दुसरीकडे भाजपातून रवींद्र चव्हाण यांना येथून लढायचं आहे. तर शिवसेना एकनाथ गटातून उदय सामंत यांच्या बंधूंना देखील लढण्याची इच्छा आहे. दुसरीकडे 2019 ला निवडून आलेले उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचीही येथे ताकद असल्याने या मतदार संघा महायुतीतर्फे कोणाही तिकीट मिळो मात्र निवडणूक चुरशीची होणार पाहा टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट...
मुंबई | 14 जानेवारी 2024 : देशातल लोकसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी लोकसभेची तयारी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच भाजपाचे निलेश राणे यांनी रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघावर जोरदार दावा केल्याने महायुतीत चांगलीच सुंदोपसुंदी सुरु झाली आहे. या मतदार संघासाठी महायुतीतूनच भाजपाचे रवींद्र चव्हाण, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील उत्सुक असल्याने सर्वच जण दावा ठोकण्याच्या स्थितीत आहेत. या सर्वांनी पक्षश्रेष्टी सांगतील तो उमेदवार स्वीकारण्याचे मात्र मान्य केले आहे. परंतू तरीही आपआपला दावा कायम ठेवला आहे. या मतदार संघात 2009 मध्ये कॉंग्रेसचे निलेश राणे निवडून आले. 2014 मध्ये निलेश राणेंचा शिवसेनेचे विनायक राऊत यांनी पराभव केले. 2019 मध्ये पुन्हा विनायक राऊतांनी निलेश राणे यांचा पराभव केला. राऊतांना 2019 मध्ये 4 लाख 58 हजार मते मिळाली होती. तर निलेश राणे यांना 2 लाख 79 हजार मते मिळाली होती.