नऊ वर्षाची चिमुकली, तिने घातली उंच शिखराला गवसणी, फडकवला भारताचा तिरंगा…

| Updated on: Aug 19, 2023 | 10:44 PM

तिला ट्रेकिंगची आवड निर्माण झाली. त्यातूनच तिने ध्यास घेतला जगातील सर्वात उंच शिखरावर कुच करण्याचा. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी तिने हे स्वप्न सत्यात उतरवले.

ठाणे : 19 ऑगस्ट 2023 | कोरोना काळात सर्व जग ठप्प असताना तिला धाडसी मोहिमांविषयी कुतुहुल वाटले. तिचे वडील सचिन विचारे हे ट्रेकर. त्यामुळे ती वेगवेगळया गडकिल्यांवर तसेच पठारांवर ट्रेकिंगसाठी वडिलांसोबत जायची. तिला ट्रेकिंगची आवड निर्माण झाली. त्यातूनच तिने ध्यास घेतला जगातील सर्वात उंच शिखरावर कुच करण्याचा. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी तिने हे स्वप्न सत्यात उतरवले. ही लहानगी चिमुरडी आहे ठाण्यातील नऊ वर्षीय ग्रिहिता सचिन विचारे. घोडबंदर रोडवरील सरस्वती शाळेत ती चौथ्या इयत्तेत शिकत आहे. दक्षिण आफिकेतील माऊंट किलीमांजरो या समुद्र सपाटीपासून ५८९५ मीटर उंच शिखराला तिने गवसणी घालत भारताचा तिरंगा तिने फडकवला आहे.

Published on: Aug 19, 2023 10:42 PM
‘ईट का जवाब पत्थर से’, भाजपचं मिशन लोकसभा सुरू, घरोघरी करणार प्रचार
सत्तेचा अमरपट्टा घेऊन आले नाही, राज ठाकरे यांनी भाजपला नेमका काय दिला इशारा?