FARAJ MALIK : नबाव मलीक यांचा फराज मलीक याच्यावर गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलीक यांना आरोपी असून सध्या त्यांचा मुक्काम जेलमध्ये आहे. जमीन मिळविण्यासाठी त्याची धडपड सुरु असतानाच आता त्यांच्या मुलांसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलीक ( NCP LEADER NAWAB MAILK ) गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात आहेत. विशेष पीएमएलए न्यायालय त्यांचा जामीन अर्ज सतत फेटाळत आहे. अशातच आता त्यांचा मुलगा फराज मलीक ( FARAJ MALIK ) याच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आपल्या दुसऱ्या पत्नीच्या व्हिसासाठी बनावट कागदपत्रे वापरली असा आरोप फराज मलीक याच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी फराज मलीक याच्यासह अन्य १४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची पोलीस अधिक कसून चौकशी करत आहेत.
फराज मलीक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्विट केले आहे. फराज मलीक याने फ्रेंच रहिवासी असलेल्या दुसरी पत्नी हॅमलीन हिच्या व्हिसा अर्जासाठी बनावट कागदपत्र दिली आहेत. दुसऱ्यांना फर्जीवाडा म्हणणारे स्वःताच किती फर्जी आहेत, असे ट्विट कंबोज यांनी केले आहे.