जिल्ह्यात देखणी बस दाखल, आमदारानं हाती घेतलं स्टेरींग, पुढे जे झालं ते…

| Updated on: Oct 12, 2023 | 3:08 PM

सिंधुदुर्गचे शिवसेना आमदार वैभव नाईक हे सडेतोड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पक्षात फुट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ देण्याचे ठरवले. वैभव नाईक यांनी जिल्ह्यात आपली पकड निर्माण केलीय. अशातच त्यांचा एक व्हिडिओ सध्या जोरदार वायरल झालाय.

सिंधुदुर्ग : 10 ऑक्टोबर 2023 | एसटी महामंडळाने राज्यात अत्याधुनिक शयनयान बस आपल्या ताफ्यात आणल्या आहेत. राज्यात सर्वात प्रथम या बसेस सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाल्या. या बसमध्ये असलेल्या अत्याधुनिक सुविधांमुळे शयनयान बसची सध्या मोठी चर्चा आहे. त्यामुळे सर्वांना या स्लीपर बसची उत्सुकता लागलेली दिसून येते. सिंधुदुर्गचे आमदार वैभव नाईक यांनी बस आगारात या बसचे स्वागत केले. मात्र, आमदार वैभव नाईक यांना या बसने भुरळ घातली. त्यांनी त्या बसची एक फेरी मारण्याचा मोह आवरता आला नाही. वाहक आणि चालक यांना त्यांनी सोबत घेतलं. स्वतः स्टेरींग हातात घेत आमदार वैभव नाईक यांनी बसचा एक फेरफटका मारला. आमदार वैभव नाईक यांचा हा व्हिडिओ सध्या जोरदार वायरल होतोय.

Published on: Oct 10, 2023 11:30 PM
राज ठाकरे यांनी कौतुक केलेला मनसेचा ‘हा’ शीख शिलेदार आहे तरी कोण?
वसंत तात्यांना लाल दिव्याची गाडी भेट. दिव्याचं काय केलं? वसंत मोरे म्हणाले…