कारंजामध्ये दुचाकी सर्व्हीस सेंटरला भीषण आग, आगीत लाखो रुपयांचे नुकसान
कारंज्यात दुचाकी सर्व्हीस सेंटरला लागलेल्या आगीमध्ये मोठे नुकसान झाले आहे. दुरूस्तीसाठी आलेल्या एका दुचाकीने पेट घेतल्यामुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे.
वाशिम : जिल्ह्यातील कारंजा शहरामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील एका दुचाकी सर्व्हीस सेंटरला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारणे केले. या आगीत दुरूस्तीसाठी आलेल्या अनेक गाड्या जळून खाक झाल्या आहेत. या घटनेत मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शहरातील संकेत ऑटोमोबाईलला ही आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप अपष्ट आहे. मात्र दुरूस्तीसाठी आलेल्या एका दुचाकीने पेट घेतल्याने ही आग लागल्याचा प्राथमीक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Published on: May 12, 2022 09:30 AM