दरड कोसळल्यामुळे ‘हा’ रस्ता आता पूर्ण पावसाळा राहणार बंद; प्रशासन काय म्हणतयं?

| Updated on: Jul 31, 2023 | 8:49 AM

या घटनेत ३० एक लोकांचा मृत्यू झाला होता. तर अनेक लोक जखमी झाली होते. तर अजूनही काही लोक बेपत्ता आहेत. त्यांना प्रशासनाने मृत घोषीत केलं.

सातारा, 31 जुलै 2023 | काही दिवसांपुर्वीच रायगडच्या इर्शाळवाडीत दरड कोसळली होती. या घटनेत ३० एक लोकांचा मृत्यू झाला होता. तर अनेक लोक जखमी झाली होते. तर अजूनही काही लोक बेपत्ता आहेत. त्यांना प्रशासनाने मृत घोषीत केलं. ही घटना ताजी असतानाच आता साताऱ्यातील पाटण तालुक्यात दरड कोसळ्याची घटना घडली आहे. येथील टोळेवाडी गावाला जोडणाऱ्या रस्त्यामध्ये दरड कोसळली आहे. त्यामुळे सध्या हा रस्ता स्थानिक प्रशासनाकडून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. तर दरड कोसळल्यामुळे हा रस्ता आता पूर्ण पावसाळा बंद राहणार असल्याचे प्रशासनाने म्हटलं आहे. तर रस्ता बंद झाल्याने चार किलोमीटरचा पायी प्रवास इथल्या नागरिकांना करावा लागणार आहे. तर याचदरम्यान काहीच दिवसांच्याआधी टोळेवाडी येथे पाटणचे उपविभागीय अधिकारी जाऊन डोंगरकडाची पाहणी केली होती. तर पावसात अनुचित घटना घडल्यास तात्काळ मदत पोहचावी यासाठी सॅटेलाईट फोनची ट्रायल घेण्यात आली होती.

Published on: Jul 31, 2023 08:49 AM
“सुंदरतेमुळे प्रियंका चतुर्वेदी खासदार”, संजय शिरसाट यांच्या दावामुळे चंद्रकांत खैरे अडचणीत? पाहा स्पेशल रिपोर्ट…
राज्यात मुसळधार पावसाचं थैमान, मात्र ‘या’ जिल्ह्यात पावसानं फिरवली पाठ; बळीराजा चिंतेत