अजित पवार यांच्या अनुपस्थिती वर्षावर मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांच्यात तासभर खलबतं
याचदरम्यान शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा पावसाळी अधिवेशानाचा पहिला दिवस विरोधकांनी चांगला गाजला आहे. येथे विरोधकांनी जोरदार विरोध पहिल्याच दिवशी दाखवून देत सभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधातच आक्षेप घेत आपला सरकारला घेरण्याचा मुनसूभा दाखवून दिला आहे.
मुंबई, 18 जुलै 2023 | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय हालचालींना वेग आला आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट दोन दिवसात दोन वेळा घेतली गेली आहे. आधी मंत्रिमंडळात मंत्री झालेले नेते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी अजित पवार गटाच्या सर्व आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. याचदरम्यान शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा पावसाळी अधिवेशानाचा पहिला दिवस विरोधकांनी चांगला गाजला आहे. येथे विरोधकांनी जोरदार विरोध पहिल्याच दिवशी दाखवून देत सभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधातच आक्षेप घेत आपला सरकारला घेरण्याचा मुनसूभा दाखवून दिला आहे. तर आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा निवासस्थानी रात्री बैठक पार पडली आहे. जवळपास तासभर ही बैठक पार पडली आहे. या बैठकीत अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष बाब म्हणजे या बैठकीला अजित पवार हे उपस्थित नव्हते. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.