tv9 Special Report | परीक्षा शुल्काचा मुद्द्याला सरकाच्या उत्तरानं फोडणी? मुद्दा आणखीन पेटणार?

| Updated on: Aug 09, 2023 | 7:23 AM

यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते विधानसभेत रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले होते. तसेच त्यांनी खासगी कंपन्यांवरून थेट सरकारवर हल्लाबोल केला होता. तर त्याचमुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव शुल्काचे समर्थन करणारे उत्तर दिले होते.

मुंबई, 9 ऑगस्ट 2023 । गेल्या काही दिवसापासून एमपीएससी परीक्षा शुल्कावरून राज्यात चांगलेच तापमान वाढले आहे. याच मुद्द्यावरून थेट पावसाळी अधिवेशनात देखील तीव्र पडसाद उमलटे होते. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते विधानसभेत रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले होते. तसेच त्यांनी खासगी कंपन्यांवरून थेट सरकारवर हल्लाबोल केला होता. तर त्याचमुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव शुल्काचे समर्थन करणारे उत्तर दिले होते. त्यावरून या वादात फोडणी पडण्याचे काम झाले होते. त्यावेळी फडणवीस यांनी विद्यार्थी हे खासगी क्लासेसला ५०-५० हजार देतात. तर परीक्षेचे गांभीर्य कायम राहावे म्हणून अधिक शुल्क करण्यात आल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता फडणवीस हेच आपल्याच नेत्याच्या एका व्हायरल व्हिडीओ क्लिपमुळे आता संकंटात सापडले आहेत. भाजप नेते व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार २०२१ मध्ये विरोधी पक्षात असताना याच मुद्द्यावरून विरोध केला होता. ती व्हिडीओ क्लिप आता चांगलीच व्हायरल होत आहे. त्यामुळे फडणवीस यांची फजिती होताना दिसत आहे. त्यावर पाहा हा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Aug 09, 2023 07:23 AM
My India My Life Goals : अन्न वाया जाणार नाही याची अशी घ्या काळजी
शेतकऱ्याला टोमॅटोने केले लखपती; पाहा दीड एकर पिकातून किती कमावले…