साताऱ्यात पेंटिंगवरून नवा वाद; आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी उडवली खिल्ली, म्हणाले…
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या पेंटिंगवरून नवा वाद सुरू झाला आहे. राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाच्या शेजारी असलेल्या इमारतीवर उदयनराजे यांचे पेंटिंग काढण्यास देसाई यांनी विरोध केला
सातारा : राज्यात काल होळी आणि धुळवड असल्याने एकमेकांचे राजकीय शत्रू देखील शुभेच्छा देत आहे. मात्र साताऱ्यात काही वेगळेच पहायला मिळत आहे. आता साताऱ्यात एका नव्या वादाला तोंड फुटलं असून यात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उडी घेतली आहे. तसेच खिल्ली उडवत हा वाद महाराष्ट्र, कर्नाटक सीमावाद आणि जम्मू-काश्मीरच्या वादापेक्षाही मोठा असल्याचे म्हटलं आहे. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या पेंटिंगवरून नवा वाद सुरू झाला आहे. राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाच्या शेजारी असलेल्या इमारतीवर उदयनराजे यांचे पेंटिंग काढण्यास देसाई यांनी विरोध केला. तसेच परवानगी नसलेले कोणतेही कृत्य साताऱ्यात चालणार नाही असा दमच त्यांनी भरला. त्यानंतर यावर शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रतिक्रिया देताना हा वाद आता संसदेत गेला आहे आणि तेथेच यावर निर्णय होईल असं म्हटलं आहे.