मुंब्रा धर्मांतर प्रकरण : युपी पोलीसांसह मुख्यमंत्र्यांना नोटीस; कोणी दिला न्यायालयात जाण्याचा इशारा

| Updated on: Jun 17, 2023 | 7:45 AM

याचदरम्यान ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून धर्मांतर करत असल्याच्या कारणावरून मुंब्रा हादरले. यावरूर गाझियाबाद पोलिसांनी ठाण्यातील मुंब्रा येथील शाहनवाजला मुंब्रा पोलिसांच्या मदतीने अलिबाग येथून अटक केली. मात्र या दरम्यान गाझियाबाद पोलिसांकडून मुंब्रा येथे 400 लोकांचे धर्मपरिवर्तन झाल्याचा संशय व्यक्त केला होता.

ठाणे : सध्या राज्यात धर्मांतर आणि औरंगजेब, टीपू सुल्तानच्या स्टेटसवरून वाद होताना दिसत आहेत. याचदरम्यान ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून धर्मांतर करत असल्याच्या कारणावरून मुंब्रा हादरले. यावरूर गाझियाबाद पोलिसांनी ठाण्यातील मुंब्रा येथील शाहनवाजला मुंब्रा पोलिसांच्या मदतीने अलिबाग येथून अटक केली. मात्र या दरम्यान गाझियाबाद पोलिसांकडून मुंब्रा येथे 400 लोकांचे धर्मपरिवर्तन झाल्याचा संशय व्यक्त केला होता. मात्र याच प्रकरणावरून आता उत्तरप्रदेश येथील गाझियाबाद येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मुंब्रा येथील समाजसेवक सय्यद अली अशरफ भाई साहब यांनी वकील जजील नवरांगे यांच्याद्वारे ही नोटीस पाठवली आहे. या नोटीसच्या माध्यमातून मुंब्रा येथील 400 धर्मपरिवर्तन झालेल्या संशयाची पुष्टी करण्यात यावी. त्याचे पुरावे सादर करण्यात यावे अन्यथा या प्रकरणी गाझियाबाद पोलिसांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे. या नोटीसच्या माध्यमातून समाजसेवक सय्यद अली यांचे म्हणणे आहे की, युपीच्या मेरठमध्ये ऑक्टोबर 2022 मध्ये 400 चा आकडा, राजस्थानच्या जयपूर मध्ये नोव्हेंबर 2022 मध्ये देखील 400 चा आकडा सांगून बदनामी करण्यात आली होती. त्यामुळे मुंब्रा 400 धर्मपरिवर्तन प्रकरणात गाझियाबाद पोलिसांनी माफी मागावी अन्यथा आम्ही गाझियाबाद पोलिसांच्या विरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचेही या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Published on: Jun 17, 2023 07:45 AM
दिल्लीमधील नेहरु मेमोरिअल म्युझियमची ओखळच बदलली आता असेल ‘हे’ नवीन नाव
ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पौळ यांना शाईफेक अन् मारहाण, नेमकं काय घडलं?