राणे-राऊत वाद पेटला? टिव्हीवरची लढाई आता थेट कोर्टात; काय कारण?
राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील आपोरांना नितेश राणे हे प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. त्याचदरम्यान आता हा टिव्हीवरचा वाद थेट उच्च न्यायालयात पोहचला आहे. त्यामुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे.
मुंबई : मागील अनेक दिवसांपासून भाजप आमदार नितेश राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आरोप-प्रत्यारोप पहायला मिळत आहेत. राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील आपोरांना नितेश राणे हे प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. त्याचदरम्यान आता हा टिव्हीवरचा वाद थेट उच्च न्यायालयात पोहचला आहे. त्यामुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. राऊत यांनी थेट राणेंवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. राऊत यांच्याकडून नितेश राणे यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठविण्यात आली असून त्यावर 4 जुलैला सुनावणी होणार आहे. तर नितेश राणेंना आता यावर कोर्टातच उत्तर द्याव लागणार आहे. त्यामुळे आता भाजप तसेच नितेश राणे यांच्याकडून कोणते पाऊल उचलले जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Published on: Jun 11, 2023 02:00 PM