नवनीत राणा प्रकरणात मोठी अपडेट; जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना धमकी सत्र सुरू आहे. मंत्री धनंजय मुंडे, छगन भुजबळ, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, आमदार रवी राणा यांना याच्याआधी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यात मोठी अपडेट आली आहे.
अमरावती : 23 ऑगस्ट 2023 | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात येत होत्या. यात काहीच दिवसाआधी मंत्री छगन भुजबळ यांचाही समावेश होता. तर त्यांनी ब्राम्हण समाजाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ती धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी पोलीस तपास करत होते. तर त्याप्रकरणी पोलीसांनी एकाला अटक केली आहे. याचदरम्यान अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना देखील धमकी देणाऱ्याच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. नवनीत राणा यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. तर काही तासांमध्येच पोलिसांनी तपास करत अमरावती शहर गुन्हे शाखेने मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथून विठ्ठलराव नामक व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.
Published on: Aug 23, 2023 08:02 AM