Shraddha Walkar | Holi Celebration | होळीनिमित्ताने पुढे आली लव्ह जिहाद विरोधी कायद्याची मागणी

| Updated on: Mar 07, 2023 | 7:54 AM

मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. तेथेच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. त्या आफताबला भर चौकात फाशी द्या अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

ठाणे : होळी हा सण आपल्यातील वाईट प्रवृत्त, वाईट गोष्टी जाळून टाकत पुढे जाण्याचा सण. याच होळीनिमित्ताने ठाण्यात एक आगळीवेगळीच होळी पहायला मिळाली. याच वेळी लव्ह जिहाद विरोधी कायद्याची मागणी येथे नागरिकांमधून करण्यात आली. या देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार असल्याने लव्ह जिहाद विरोधी कायदा व्हायला हवा, कायदा झाला तरच आपल्या मुली सुरक्षीत राहतील असेही नागरिकांच्यातून बोलण्यात येत आहे. त्याचबरोबर या होळीनिमित्ताने‘लिव्ह इनमुळे’ श्रद्धा वालकरला तिचा जीव गमवावा लागला. मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. तेथेच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. त्या आफताबला भर चौकात फाशी द्या अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

Pune PMPML Strike : तब्बल ३० तासानंतर पुण्यात पुन्हा धावणार PMPML
सेनाभवन ताब्यात घेणार नाही, पण ही शाखा फक्त आमचीच!; शिवसेनेच्या नेत्याची आक्रमक भूमिका