train accident : रेल्वे अपघातामागे सिग्नल बिघाड? प्राथमिक अहवालातून काय आलं समोर?

| Updated on: Jun 04, 2023 | 2:08 PM

हा अपघात कसा झाला, या प्राथमिक अहवाल समोर आला आहे. या तपास अहवालात भीषण घटनेमागे सिग्नलशी संबंधित बिघाड उघड झाला आहे. याबाबत ओडिशा अपघाताची माहिती देण्यासाठी रेल्वेची पत्रकार परिषद झाली. ज्यामध्ये अपघातावेळी सिग्नल यंत्रणेत बिघाड होता, अशी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

मुंबई : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 280 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे एक हजारहुन अधीक लोक जखमी झाले आहेत. तीन गाड्यांच्या या भीषण धडकेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान यावरून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीमान्याची विरोधकांनी मागणी केली आहे. मात्र आता हा अपघात कसा झाला, या प्राथमिक अहवाल समोर आला आहे. या तपास अहवालात भीषण घटनेमागे सिग्नलशी संबंधित बिघाड उघड झाला आहे. याबाबत ओडिशा अपघाताची माहिती देण्यासाठी रेल्वेची पत्रकार परिषद झाली. ज्यामध्ये अपघातावेळी सिग्नल यंत्रणेत बिघाड होता, अशी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. तर फक्त कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाल्याचे यावेळी सांगण्यात आलं आहे. तर अपघाताच्या वेळी कोरोमंडल एक्सप्रेसचा वेग 126 किमी प्रतितास एवढा होता अशीही माहिती देण्यात आली आहे. ही सर्व माहिती रेल्वे बोर्ड सदस्या जया वर्मा सिंन्हा यांनी दिली.

Published on: Jun 04, 2023 02:08 PM
‘… मी समजावून सांगतो, तुम्ही काळजी करू नका’; अजित पवार पत्रकारांवरच भडकले
“शाहरुखच्या मुलाची काळजी , मग मंचरमधील पीडितेला कधी भेटणार ?, नितेश राणे यांचा सुप्रिया सुळेंना सवाल