Barsu Refinery : बारसू रिफायनरी कायमचा हद्दपार करा; आझाद मैदानात आज ठिय्या आंदोलन
याच रिफायनरिवरून स्थानिकांसह विरोधकांनी सरकारविरोधात राण उठवले होते. आताही याच्याविरोधात आता बारसू-सोलगाव पंचक्रोशीतील जनता मुंबईत एकवटली आहे.
मुंबई,18 जुलै 2023 | कोकणात होऊ घातलेल्या बारसू रिफायनरिवरून जोरदार विरोध झाला होता. याच रिफायनरिवरून स्थानिकांसह विरोधकांनी सरकारविरोधात राण उठवले होते. आताही याच्याविरोधात आता बारसू-सोलगाव पंचक्रोशीतील जनता मुंबईत एकवटली आहे. बारसू येथील हा विनाशकारी रिफायनरी प्रकल्प कायमचा हद्दपार व्हावा यासाठी आझाद मैदानात आज ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. तर बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघर्ष समिती आणि बारसू रिफायनरी विरोधी राज्यव्यापी लढा समिती यांच्याकडून हे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
Published on: Jul 18, 2023 10:14 AM