Aurangabad | समृद्धी महामार्गावरील बोगद्यांच्या प्रवेशद्वारावर अजिंठा लेणींची प्रतिकृती साकारली
बोगद्याच्या सौंदर्यात आणखी भर पाडण्यासाठी या बोगद्याच्या चारही प्रवेशद्वारांवर अजिंठा लेणीची( Ajanta Caves) प्रतिकृती साकारण्यात येत आहे अजिंठा लेणीत असलेली शिल्प अत्यंत अखीव रेखीव पद्धतीने या बोगद्याच्या प्रवेशद्वारावरती कोरली जात आहेत त्यामुळे या बोगद्याच्या सौंदर्यात चार चांद लागत आहेत.
औरंगाबाद: औरंगाबाद शहरांमध्ये समृद्धी महामार्गावर( Samriddhi Highway) मराठवाड्यातील सगळ्यात पहिला बोगदा कोरण्यात आला आहे. मात्र या बोगद्याच्या सौंदर्यात आणखी भर पाडण्यासाठी या बोगद्याच्या चारही प्रवेशद्वारांवर अजिंठा लेणीची( Ajanta Caves) प्रतिकृती साकारण्यात येत आहे अजिंठा लेणीत असलेली शिल्प अत्यंत अखीव रेखीव पद्धतीने या बोगद्याच्या प्रवेशद्वारावरती कोरली जात आहेत त्यामुळे या बोगद्याच्या सौंदर्यात चार चांद लागत आहेत. औरंगाबाद जवळ असलेल्या हर्सूल सावंगी परिसरातल्या डोंगरांमध्ये हा बोगदा आहे याच बोगद्यावरती या ठिकाणी अजिंठा लेणीची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे. गौतम बुद्धाच्या मूर्ती असल्याचा आपल्याला पाहायला मिळतात वेरूळ अजिंठा लेणी मधली जी काही वेगवेगळी शिल्प आहेत ते शिल्प सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेत. ऐतिहासिक साज समृद्धी महामार्गावरच्या या बोगद्याला देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे