भरधाव डम्परचा आवाज आला, अन् क्षणात उडी मारली म्हणून ठाकरे गटाचा खासदार थोडक्यात बचावला
एका टिप्पर चालकाने त्याचे वाहन भरधाव वेगाने चालवीत तो खासदार ओमराजे यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र दैवबलवत्तर म्हणून अनर्थ टळला. ओमराजे यांनी प्रसंगावधान राखत रोडच्या खाली उडी मारली. त्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात वाचला.
धाराशिव : धाराशिव जिल्ह्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे सकाळी व्यायाम करायला जात असताना थोडक्यात बचावले. एका टिप्पर चालकाने त्याचे वाहन भरधाव वेगाने चालवीत तो खासदार ओमराजे यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र दैवबलवत्तर म्हणून अनर्थ टळला. ओमराजे यांनी प्रसंगावधान राखत रोडच्या खाली उडी मारली. त्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात वाचला. त्यानंतर त्या टिप्परचा पाठलाग करीत एकास पकडले. या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाला असून एका आरोपीस अटक देखील करण्यात आलीये. निंबाळकर हे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गोवर्धनवाडी येथील आपल्या राहत्या घरापासून काही अंतरावरच गेले होते. व्यायाम करून घरी परतत असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव डम्परचा त्यांना आवाज आला. खासदार निंबाळकर यांनी पाठीमागे वळून पाहिले तर डम्पर मोठ्या वेगाने त्यांच्या दिशेने येत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता त्यांनी यांनी रोडच्या खाली उडी मारली. तेव्हा डंपर पुढे निघून गेला होता. मात्र पाठलाग करून त्याला पकडले.