‘शिंदे आणि फडणवीस यांची जमलेली आहे जोडी… रामदास आठवलेंची खास कविता

| Updated on: Jul 11, 2022 | 7:08 PM

जो पर्यंत नरेंद्र मोदी खंबीरपणे आहेत, तो पर्यंत आम्हाला कोणतीही चिंता नाही. अस सांगून आठवले पुढे म्हणाले, 'शिंदे आणि फडणवीस यांची जमलेली आहे जोडी, अडीज वर्ष चालणार आहे सत्तेची गाडी' अशी कविता सुद्धा आठवले यांनी सादर केली

सांगली :  यापूर्वी महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही, अस आम्ही म्हणत होतो. आता विरोधक हे आमचं राज्यसरकार चालणार नाही अस म्हणत आहेत. मात्र आमचं राज्य सरकार फक्त अडीजवर्षं नाही तर पुढील दहा वर्षे टिकणार आहे, असा दावा केंद्रीय सामाजीक न्याय मंत्री रामदास आठवले(Ramdas Athavale) यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी आठवले हे बोलत होते. या संलेनच उदघाटन माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जो पर्यंत नरेंद्र मोदी खंबीरपणे आहेत, तो पर्यंत आम्हाला कोणतीही चिंता नाही. अस सांगून आठवले पुढे म्हणाले, ‘शिंदे आणि फडणवीस यांची जमलेली आहे जोडी, अडीज वर्ष चालणार आहे सत्तेची गाडी’ अशी कविता सुद्धा आठवले यांनी सादर केली. साहित्यिक आणि कादंबरीकार डॉ. शंकरराव खरात यांच्या स्मारकासाठी 40 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी माहिती ही केंद्रीय सामाजीक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली.
Published on: Jul 11, 2022 07:08 PM
राष्ट्रवादी 27 टक्के उमेदवार OBC समाजाचे देणार
पालघरमध्ये मुसळधार पाऊस, पिंजाळ नदीला पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा