खऱ्या कार्यकर्त्याला त्यागाची भूमिका स्वीकारावी लागते, मंत्रिमंडळाबाबत देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य

| Updated on: Jul 23, 2022 | 8:43 PM

प्रत्येकाचा समावेश मंत्रिमंडळात करता येऊ शकत नाही. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास कुणीही नाराज होऊ नये, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

मुंबई : खऱ्या कार्यकर्त्याला त्यागाची भूमिका ही सोसावी लागते. अनेक लोकं मला विचारतात. त्याग आम्हीच करायचा का. पण, कुणालातरी करावाच लागेल. स्वच्छ प्रामाणिक, लोकाभूमिक सरकार आम्ही देण्याचा प्रयत्न करणार, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. जे जे होऊ शकते ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. एकनाथ शिंदे हे चोवीस तास काम करतात. कुणीही भेटू शकते. कुणीही बोलू शकतं. प्रत्येकाचा समावेश मंत्रिमंडळात करता येऊ शकत नाही. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास कुणीही नाराज होऊ नये, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

Published on: Jul 23, 2022 08:43 PM
Aditya Thackeray : साईबाबांचे आशीर्वाद नेहमीच आमच्यासोबत; शिर्डीत साईबाबांच्या दर्शनानंतर आदित्य ठाकरेंचं प्रतिपादन
राज्यात ओबीसी आरक्षण कसं लागू झालं, देवेंद्र फडणवीसांनी सविस्तर सांगितलं