धक्कादायक! मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ? कचऱ्यातील कांदा बटाटा पोहचला थेट…
सध्या कांद्याला आणि बटाट्याला भाव मिळत नसल्याचे समोर येत आहे. त्यातच एपीएमसीमध्ये कांदा बटाट्यासह सडलेला इतर भाजीपाला हा कचऱ्यात टाकला जात आहे. मात्र नवी मुंबई एपीएमसीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर येत असून मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे यातून समोर येत आहे.
नवी मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिपाऊस झाल्याने कांदा खराब झाला होता. तर सध्या कांद्याला आणि बटाट्याला भाव मिळत नसल्याचे समोर येत आहे. त्यातच एपीएमसीमध्ये कांदा बटाट्यासह सडलेला इतर भाजीपाला हा कचऱ्यात टाकला जात आहे. मात्र नवी मुंबई एपीएमसीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर येत असून मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे यातून समोर येत आहे. येथील एपीएमसीमध्ये कचऱ्यात टाकण्यात आलेला कांदा-बटाटा हा थेट विक्रीसाठी रस्त्यावर जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओत व्यापाऱ्यांनी कचऱ्यात फेकून दिलेले सडलेले कांदे, बटाटे रस्त्यावरील विक्रेते निवडून घेऊन जात असून त्याची मॅफको मार्केट येथे रस्त्यावर विक्री करण्यात येत असल्याचं दिसत आहे. तर पावसाळ्यात कचऱ्यात टाकून दिलेले कांदे बटाटे तेथेच असलेल्या घाणीच्या पाण्यात धुवून नंतर त्याची विक्री केली जात असल्याचे या व्हायरल व्हिडिओत दिसत आहे. त्यामुळे रस्त्यावरील कांदे बटाटे घेत असाल तर नक्की सावध व्हा अन्यथा आजाराला स्वतःहून आमंत्रण द्याल. तर अशा प्रकारचे व्हिडिओ वायरल होत असल्याने नवी मुंबईकर यांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.