गव्याचा मुक्तसंचार, दैव बलवत्तर म्हणून महिलेचे वाचले प्राण, अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ!
दैव बलवत्तर म्हणून एक महिला गव्याच्या हल्ल्यामधून थोडक्यात बचावली आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
कोल्हापूर : ‘देव तारी त्याला कोण मारी’? या म्हणीचा प्रत्यय हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यानंतर येतो. हा व्हायरल व्हिडीओ कोल्हापूर जिल्ह्यातील अजरा तालुक्यातील आहे. महिला गव्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावली आहे. अजरा तालुक्यात गव्याचा वावर नित्याचाच झाला आहे. असाच एका गावात गवा मोकाट फिरत असताना त्याच्या हल्ल्यातून महिला थोडक्यात बचावली आहे. गव्याच्या मुक्तसंचाराने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
Published on: Oct 21, 2022 09:12 AM