VIDEO | ही बातमी वाचाच! घराबाहेर पडण्याआधी हवामान विभागाचा ‘हा’ अलर्ट पहाच

| Updated on: Jun 04, 2023 | 2:55 PM

आगामी आठवडाभरही तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे राहणार असून दोन दिवस जिल्ह्यातील ठरावीक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलाय.

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात उष्ण तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आगामी आठवडाभरही तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे राहणार असून दोन दिवस जिल्ह्यातील ठरावीक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलाय. याबाबत जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दुपारपर्यंत जरी जिल्ह्यात उष्ण तापमान राहणार असले, तरी सायंकाळनंतर मात्र जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. जिल्ह्यातील दोन ते तीन तालुक्यांमध्ये 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

Published on: Jun 04, 2023 10:40 AM
नाना पटोले यांचा उद्या वाढदिवस, नागपुरात बॅनरबाजी, पटोले म्हणतात…
प्रकाश आंबेडकर कोणत्या पदाधिकारीसाठी उतरले मैदानात? ॲट्रोसिटी दाखल करण्याची मागणी का केली?