मुंबईची तुंबई! आरोप-प्रत्यारोप फैरी सुरू; शिंदे यांच्यावर आदित्य ठाकरे यांच्यानंतर अजितदादाही तुटून पडले!
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली. लोकांना नाहक त्रास झाला मुख्यमंत्री शिंदे यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी टीका केली. त्यापाठोपाठ विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील टीका करताना शिंदे यांच्यासह सरकारला उपरोधिक टोला लगावला.
मुंबई : पहिला पाऊस पडला आणि मुंबईकरांना एकच दिलासा मिळाला. मात्र याच पावसाने अनेकांचे भिंबेरी उडवली. अनेक भागात पाणी साचले. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. गेल्या काहीच दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेत्यांनी मुंबईतील नालेसफाई स्वत: पाहणी करत मुंबईत पाणी साचणार नाही असा दावा केला होता. तो आता फोल ठरला आहे. त्यातच मुख्यमंत्री शिंदे यांनी, पाऊस आल्याचे स्वागत करा. मुंबईत पाणी तुंबलय याची तक्रार काय करता असा प्रति सवालच पत्रकारांना केला. त्यावरून आजा वार पलटवार होताना पहायला मिळत आहे. यांच्या या वक्तव्यावरून पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली. लोकांना नाहक त्रास झाला मुख्यमंत्री शिंदे यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी टीका केली. त्यापाठोपाठ विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील टीका करताना शिंदे यांच्यासह सरकारला उपरोधिक टोला लगावला. त्यांनी कामे सुरु आहेत. त्यामुळं पाणी साचलं आहे. कामं झाल्यावर बघा, अजिबात मुंबई तुंबणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे सध्या पावसामुळे मुंबईमध्येही अनेक ठिकाणी पाणी साचल्याने मुख्यमंत्री शिंदे विरोधकांच्या रडारवर आले आहेत. त्यावरच हा स्पेशल रिपोर्ट