वेदांता प्रकल्प पळवून न्यायला महाराष्ट्र पाकिस्तान होता काय?; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना करारा जवाब
26 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं वेदांता 4 लाख कोटींची गुंतवणूक घेऊन येणार आहे. तुमचा दावा पत्रात होता. मग हे का नाही झालं? जी गुंतवणूक 100 टक्के आपल्या महाराष्ट्रात होणार होती, ती का झाली नाही? असंही ते म्हणाले.
मुंबई: वेदांता प्रकल्प (vedanta project) गुजरातला गेला. गुजरात हे काय पाकिस्तान आहे काय? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी शिवसेनेला केला होता. शिवसेना नेते आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी फडणवीसांना यावरून प्रत्युत्तर दिलं आहे. मग हा प्रकल्प गुजरातमध्ये पळवून न्यायला महाराष्ट्र हा काय पाकिस्तान होता का? राज्यात रोजगार येणार होता. तो हिरावून घेतला. आमच्या पोरांनी काय चूक केली? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. तर माझ्यावर घरच्यांचे संस्कार आहेत. त्यामुळे मी काही बोलत नाही, असं सांगत आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर बोलण्यास नकार दिला. चौकशी कुणाची करणार? प्रकल्प का नाही आला? केंद्राची चौकशी करणार की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची चौकशी करणार? असा सवालही त्यांनी राणेंना विचारला. 26 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं वेदांता 4 लाख कोटींची गुंतवणूक घेऊन येणार आहे. तुमचा दावा पत्रात होता. मग हे का नाही झालं? जी गुंतवणूक 100 टक्के आपल्या महाराष्ट्रात होणार होती, ती का झाली नाही? असंही ते म्हणाले.