Aaditya Thackeray : मुंबई महापालिकेला का बदनाम केलं जातंय? माजी मंत्री आदित्य ठाकरेंचा सवाल

| Updated on: Aug 25, 2022 | 12:49 PM

'मुंबई महापालिकेच्या चौकशी जरूर करा. पण पिपंरी चिंचवडसह इतर महापालिकांचीही चौकशी करा. मुंबई महापालिकेला का बदनाम केलं जात आहे? मुंबई महानगरपालिकेचं नाव देशात आहे. काम लपवण्याचा प्रयत्न'

मुंबई : ‘महापालिकेच्या (BMC) घोटाळ्याच्या चौकशीवरूनही माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सरकारला प्रत्युत्तर दिलं. मुंबई (Mumbai) महापालिकेची चौकशी होऊ दे आमच्या चांगल्या कामाचं मार्केटींग समोर येईल, असं आदित्य ठाकरे म्हणालेत. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. दरम्यान, मुंबई महापालिकेवर बोलताना त्यांनी एकप्रकारे सरकारला टोला लगावलाय. मुंबई महापालिकेच्या चौकशी जरूर करा. पण पिपंरी चिंचवडसह इतर महापालिकांचीही चौकशी करा. मुंबई महापालिकेला का बदनाम केलं जात आहे? मुंबई महानगरपालिकेचं नाव देशात आहे. मुंबई महापालिकेचं चांगलं काम लपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीवरून शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मुंबई महापालिकेची कॅग मार्फत चौकशी करण्याचं सरकारने जाहीर केलं आहे.

Published on: Aug 25, 2022 12:49 PM
Aaditya Thackeray : शिंदे गटाचे आमदार दिलेल्या स्क्रिप्टनुसार बोलतात, आदित्य ठाकरेंचा आरोप
Pravin Darekar | आधी आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा : प्रवीण दरेकर-Tv9