Shivsanwad Yatra: आदित्य ठाकरे यांची औरंगाबाद येथे शिवसंवाद यात्रा
आदित्य ठाकरे यांची औरंगाबाद येथे आज शिवसंवाद यात्रा आहे. त्यानिमित्याने मोठ्या संख्येने शिवसैनिक त्यांच्या स्वागतासाठी जमलेले आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासाठी मोठा हार आणण्यात आलेला आहे. शिवसैनिकांनी त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरेसुद्धा कार्यकर्त्यांचे स्वागत स्वीकारत सगळ्यांना हात मिळवताना दिसत आहेत. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर पक्षाला बळकटी देण्यासाठी आदित्य […]
आदित्य ठाकरे यांची औरंगाबाद येथे आज शिवसंवाद यात्रा आहे. त्यानिमित्याने मोठ्या संख्येने शिवसैनिक त्यांच्या स्वागतासाठी जमलेले आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासाठी मोठा हार आणण्यात आलेला आहे. शिवसैनिकांनी त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरेसुद्धा कार्यकर्त्यांचे स्वागत स्वीकारत सगळ्यांना हात मिळवताना दिसत आहेत. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर पक्षाला बळकटी देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी दौऱ्यांचा धडाका लावलेला आहे. या माध्यमातून ते शिवसैनिकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करीत असून शिंदे गटावर आरोपांच्या फैरी झाडात आहेत. आरोप प्रत्यारोप दोनीही बाजूने होत आहे.
Published on: Jul 23, 2022 01:31 PM