आरे कारशेड होणारच, 53 झाडांचे प्रत्यारोपण तर किती झाडं कापली जाणार?
सर्वौच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आता आरे कारशेड परिसरातील 177 झाडं एमएमआरसीएलकडून तोडण्यास सुरूवात होणार आहे. याच्याआधी झालेला विरोध पाहता येथील आरे कारशेड परिसरात सकाळपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मुंबई : आरेतील मेट्रो कारशेडसाठी होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका सर्वौच्च न्यायालयाने निकाली काढली. त्यामुळे येथील वृक्षतोडीचा व पर्यायाने मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुले येथील आता 124 झाडं ही कापली जाणार आहेत. तर 53 झाडांचे प्रत्यारोपण होणार आहे. सर्वौच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आता आरे कारशेड परिसरातील 177 झाडं एमएमआरसीएलकडून तोडण्यास सुरूवात होणार आहे. याच्याआधी झालेला विरोध पाहता येथील आरे कारशेड परिसरात सकाळपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर वृक्षतोडी दरम्यान अडथळा येऊ नये यासाठी एका पर्यावरणप्रेमीला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं आहे. तर येत्या वर्षाच्या शेवटाला मेट्रो 3 चा पहिला फेज सुरु करण्याचा मानस एमएमआरसीएलचा आहे. आरे दुग्ध वसाहतीत बांधण्यात येणाऱ्या मेट्रो 3 मार्गिकेच्या कारशेडचा प्रकल्प सार्वजनिकदृष्ट्या हिताचा आणि महत्त्वाचा असला तरी प्रकल्पासाठीच्या वृक्षतोडीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होतं.