Aarey Metro : आरे कारशेड प्रकरणावर आज सुनावणी, पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात सादर केले पुरावे

| Updated on: Aug 24, 2022 | 10:44 AM

आज सकाळी 11.30 पर्यंत सुनावणी सुरु होऊ शकते. पर्यावरणप्रेमींकडून ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन आणि प्रशांत भूषण याचिकाकर्त्यांची बाजू मांडतील. आजच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे. याविषयी अधिक जाणून घ्या...

मुंबई : एक मोठी बातमी हाती आली आहे. आज आरे कारशेड (Aarey Metro Car Shade) प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात (Court) सुनावणी होणार आहे. एकूणच कारशेड प्रकरआपूर्णातील याचिका निकालात निघण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती उदय लळित यांच्या खंडपीठासमोर याचिका आहे. याआधी प्रकरण 10 ऑगस्टला लिस्ट झालं होतं. आरे कारशेड (Aarey Metro) परिसरातील काम थांबवावे आणि वृक्षतोड न होण्यासाठी याचिका दाखल आहे. मात्र वेळेअभावी सुनावणी झाली नव्हती. आज सकाळी 11.30 पर्यंत सुनावणी सुरु होऊ शकते. पर्यावरणप्रेमींकडून ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन आणि प्रशांत भूषण याचिकाकर्त्यांची बाजू मांडतील. आजच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे. आज काय होतं, सुनावणीत काय निकाल येणार, हे पहावं लागणार आहे. कारशेडच्या निर्णयाकडे विशेष लक्ष आहे.

Published on: Aug 24, 2022 10:42 AM
Sonia Gandhi : सोनिया गांधी वैद्यकीय तपासणीसाठी परदेशी जाणार, राहुल, प्रियंका गांधींही सोबत असणार
Video: बहुमत चाचणीआधी बिहारमध्ये ईडीचं धाडसत्र