Aurangabad | औरंगजेबाची कबर कायमस्वरुपी बंद करावी : आबासाहेब पाटील
औरंगाबाद येथे औरंगजेबच्या कबरीवरून सध्या वातावरण चांगलेच गरम आहे. त्यातच आता या वादात क्रांती मोर्चाने उडी घेतली आहे. तर क्रांती मोर्चाकडून औरंगजेबाची कबर कायमस्वरुपी बंद करा असे म्हटलं आहे
औरंगाबादः एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या राजकीय पक्षांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर राज्य शासनाने त्या कबरीला बंदोबस्त ही पुरवला त्यावरूनही राज्यातील हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या राजकीय पक्षांनी टीका केली. त्यामुळे पुरातत्व विभागाने वादग्रस्त ठरलेली औरंगजेबाची कबर (Aurangzeb Tomb) पर्यटकांसाठी (Tourist)पाच दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच जर हा वाद शांत झाला नाही आणि आहे तशीच स्थिती राहीली तर पुन्हा पाच दिवस कबरीचे दर्शन बंद केले जाणार आहे. यावर आता क्रांती मोर्चाकडून या कबरीचे दर्शनच देऊ नये असे म्हटले आहे. तर औरंगजेबाची कबर कायमस्वरुपी बंद करा असे क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे.
Published on: May 19, 2022 07:52 PM