Special Report | आदित्य ठाकरेंचं आव्हान सत्तारांनी स्वीकारलं
2019 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर त्यांना उद्धव ठाकरेंनी राज्यमंत्री केलं. शिंदेंनी जेव्हा बंड पुकारलं, त्यावेळी त्यांच्यासोबत सत्तार सर्वात पुढे होते. आता शिंदे गटात आल्यानंतर सत्तारांना पुन्हा मंत्री व्हायचं आहे..त्यासाठी त्यांनी मुंबईत शिंदेंच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करुन शक्तिप्रदर्शनही केलंय.
मुंबई : आदित्य ठाकरेंचं चॅलेज शिंदे गटाचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तारांनी(Abdul Sattar ) स्वीकारलंय. आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) शिंदे गटातल्या आमदारांना गद्दार म्हणत राजीनामा देण्याचं आव्हान देत आहेत. हेच आव्हान अब्दुल सत्तारांनी स्वीकारलं असून, 31 तारखेला मुख्यमंत्री शिंदे सिल्लोडला येणार असून, त्यांच्यासमोरच राजीनामा देण्याची घोषणा करण्याची तयारी सत्तारांनी केलीय. काँग्रेस ते शिवसेना असा अब्दुल सत्तारांचा राजकीय प्रवास राहिलाय. 2001 मध्ये काँग्रेसकडून पहिल्यांदा विधानपरिषदेवर आमदार झाले. 2009 ते आतापर्यंत सिल्लोडमधून सलग 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले. 2009-14 मध्ये पशूसंवर्धन खात्याचे राज्यमंत्री होते. 2019 मध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, सत्तार नाराज झाले. आणि त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपच्या वाटेवर होते, पण स्थानिक भाजपकडून विरोध झाला. त्यामुळं शिवसेनेत प्रवेश केला.
2019 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर त्यांना उद्धव ठाकरेंनी राज्यमंत्री केलं. शिंदेंनी जेव्हा बंड पुकारलं, त्यावेळी त्यांच्यासोबत सत्तार सर्वात पुढे होते. आता शिंदे गटात आल्यानंतर सत्तारांना पुन्हा मंत्री व्हायचं आहे..त्यासाठी त्यांनी मुंबईत शिंदेंच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करुन शक्तिप्रदर्शनही केलंय. आणि सिल्लोडमधल्या ताकद आहे हे सांगतानाच उद्धव ठाकरेंनाही आव्हान दिलं. आदित्य ठाकरेंचं आव्हान तर सत्तारांनी स्वीकारलंय. त्यामुळं 31 तारखेला घोषणा केल्यानंतर शिंदे सत्तारांचा राजीनामा स्वीकारतात का ?, हेही दिसेलच.