कृषी मंत्र्यांवर मुख्यमंत्री शिंदे नाराज? अब्दुल सत्तार म्हणाले, “तो सल्ला…”

| Updated on: Jun 15, 2023 | 10:44 AM

गेल्या काही दिवसांपासून राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार चांगलेच चर्चेत आले आहेत. अकोल्यात कृषी विभागाकडून बोगस बियाण्यांप्रकरणी छापेमारी करण्यात आली. यासंबंधित घटनेमुळे विरोधकांनी अब्दूल सत्तारांवर निशाणा साधला आहे. याचबरोबर धाडीवरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत सत्तारांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच संतपाल्याची माहिती समोर आली आहे.

औरंगबाद : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार चांगलेच चर्चेत आले आहेत. अकोल्यात कृषी विभागाकडून बोगस बियाण्यांप्रकरणी छापेमारी करण्यात आली. यामुळे अब्दुल सत्तारांवर नामुष्कीची वेळ आली आहे. यासंबंधित घटनेमुळे विरोधकांनी अब्दूल सत्तारांवर निशाणा साधला आहे. याचबरोबर धाडीवरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत सत्तारांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच संतपाल्याची माहिती समोर आली आहे. यावर आता अब्दुल सत्तार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, “सावधपणे कारवाई करा इथपर्यंत ठीक आहे. पण नाराजी वगैरे असा काही भाग नाही. जे काही बियाणे विक्री होत आहे, यातला बोगसपणा आणि इतर गोष्टी मी त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना बोललो. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कृषी विभाग, महसूल विभाग आणि पंचायत विभागामध्ये अधिकाऱ्यांची निवड करायला सांगितलं आहे. काळाबाजार रोखला जाणार आहे मात्र काही लोक पुड्या सोडत आहेत त्याला मी महत्त्व देत नाही.”

Published on: Jun 15, 2023 10:44 AM
‘पालकमंत्री हरवले आहेत! आपण त्यांना पाहिलंत का?’ शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया म्हणाले, ‘पहा मी येथे’
धीरगंभीर होणाऱ्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांचा टोला; उपस्थितांमध्ये खसखस पिकली