‘त्या’ आरोपांचे परिणाम संजय राऊत यांना भोगावे लागणार; मंत्री अब्दुल सत्तार यांचा इशारा
मंत्री अब्दुल सत्तार यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.तसंच त्यांनी शिंदेगटाच्या बंडखोरी मागचं कारण सांगितलं आहे. काय म्हणालेत? पाहा...
औरंगाबाद : मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिंदेगटाच्या बंडखोरी मागचं कारण सांगितलं आहे. तसंच त्यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. “श्रीकांत शिंदे प्रामाणिक युवा नेते आहेत. पण त्यांच्यावर आरोप करणं, ही राजकीय खेळी आहे. श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप करण्याचे परिणाम संजय राऊत यांना भोगावे लागतील”, असं सत्तार म्हणाले आहेत. “अपात्र होऊ शकणाऱ्या 16 आमदारात मीच नाही तर आमचे मुख्यमंत्री पण आहेत. पण बंडखोरीचा निर्णय जर एकनाथ शिंदे यांनी घेतला नसता तर शिवसेनेला खूप मोठी किंमत मोजावी लागली असती”, असंही सत्तार म्हणालेत.
Published on: Feb 23, 2023 10:27 AM