आमदार-खासदारांचं बहुमत, शिवसेना पक्ष-चिन्ह अन् निवडणूक आयोग; विरोधकांच्या टीकेला अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर
शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय दिला. त्यानंतर विरोधकांकडून टीका करण्यात आली. त्याला मंत्री अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिलं आहे. पाहा...
औरंगाबाद : शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेगटाकडे असेल, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर विरोधकांकडून टीका करण्यात आली. त्याला मंत्री अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिलं आहे. आमच्या आमदार आणि खासदारांना मिळालेली मते पाहता आम्हाला चिन्ह आणि पक्ष मिळणारच होता. अखेर तो मिळाला. लोकशाहीत न्यायालय किंवा निवडणूक आयोग कुणालाही कधीही मॅनेज होऊ शकत नाही. ज्यांचा आत्मविश्वास गेलेला असतो ते लोक असे बेछूट आरोप करतात, असं अब्दुल सत्तार म्हणालेत. शंका कुशंका निर्माण करणे हा विरोधीपक्षाचा फंडा बनला आहे. पण टीका करताना विरोधी पक्षांनी भान ठेवायला पाहिजे, असं सत्तार म्हणाले आहेत.
Published on: Feb 23, 2023 10:19 AM