दुश्मन को भी जिंदा रखने की दुवा करनेवाला मुख्यमंत्री
प्रत्येक शेतकऱ्याला मदत पोहचवण्याचे काम केले जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितले. योग्य पंचनामे करण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
एक दिवस बळीराजासोबत या उपक्रमांतर्गत अमरावती जिल्ह्यापासून या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करत असल्याची माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितली. यावेळी राष्ट्रवादी पक्षाकडून जयंत पाटील यांनी हे सरकार घटनाबाह्य असून हे सरकार लवकरच कोसळेल अशी टीका केल्यानंतर त्यांनी पलटवार खात विरोधकांना असं वाटणं साहजिकच असल्याचेही त्यांनी सांगितले. अब्दुल सत्तार यांनी आज मुख्यमंत्र्यांजवळचे आमदार चंद्रकात पाटील यांची भेट घेत ते आजपासून पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले जाणार असून यामध्ये कोणताही शेतकरी चुकणार नाही. प्रत्येक शेतकऱ्याला मदत पोहचवण्याचे काम केले जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितले. योग्य पंचनामे करण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.