अजित पवार यांच्या बंडामागे शरद पवार यांची खेळी? पाहा काय म्हणाले अभिजीत बिचुकले?
अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राज्याच्या राजकारणाचं समीकरण बदललं आहे. अजित पवार यांच्या बंडावर बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सातारा, 31 जुलै 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणात महाभूकंप आला. अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राज्याच्या राजकारणाचं समीकरण बदललं आहे. अजित पवार यांच्या बंडावर बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्याच्या राजकारणावर अभिजीत बिचुकले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, “शिवसेनेतून बाहेर पडताना एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही असं म्हटलं होतं मग आता त्यांचं काय झालं? एकनाथ शिंदे जर गद्दार आहेत, मग अजितदादा कोण आहेत? ज्यावेळी शरद पवार यांनी राजीनामा नाट्य केलं होतं त्यावेळी अजित पवार यांचे हावभाव बघायला पाहिजे होतं. अजित पवार यांना शरद पवार यांचं नेतृत्व मान्य नाही. मला नाही वाटत यात शरद पवार यांची खेळी असेल.”