Abhishek ghosalkar case | माझ्यावर अन्याय झालाय, फसवलं गेलंय, मॉरीसच्या अंगरक्षकाने केला दावा

| Updated on: Feb 10, 2024 | 3:50 PM

शिवसेनेचे दहीसरचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्ये प्रकरणात वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणात आरोपी मॉरीस याने स्वत: आत्महत्या केली याची चर्चा सुरु असताना या प्रकरणात दोघांची सुपारी देऊन हत्या तर झाली नाही ना असा सवाल ठाकरे यांनी करीत चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणात मॉरीस याने त्याचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याचे रिव्हॉल्वर वापरल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी अमरेंद्र मिश्रा याला 13 तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

Follow us on

मुंबई | 10 फेब्रुवारी 2024 : दहीसर येथील शिवसेना नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुल लाईव्ह दरम्यान गोळीबार करीत त्यांची हत्या करणाऱ्या गुंड मॉरीस नरोव्हा याने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. मात्र या प्रकरणात मॉरीस याच्या आत्महत्या आणि एकंदर प्रकरणावर शिवसेना नेते माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संशय व्यक्त केला आहे. संतापाच्या भरात एखादे कृत्य व्यक्ती करु शकतो. परंतू त्याने आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकत नाही. कोणी या दोघांची सुपारी देऊन हत्या तर केली नाही ना असा सवाल उद्धव ठाकरे यांनी करीत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मॉरीस याच्याकडे स्वत:चे रिव्हॉल्वर नव्हते. त्याने त्याच्या अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याचे रिव्हॉल्वर वापरून ही हत्या केल्याचे म्हटले जात आहे. परंतू मॉरीस याला सुरक्षेची एवढी काय गरज असाही सवाल ठाकरे यांनी केला आहे. दरम्यान, अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला अवैध शस्र बाळगल्याप्रकरणात अटक झाली आहे. त्याने मुझपर अन्याय हुआ है, मुझे फसाया गया है असे म्हटले आहे. मिश्रा याला 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.