औरंगाबादचं नाव बदलल्याने गोपीचंद पडळकर यांच्याकडून सरकारचे आभार; ‘या’ शहराचंही नाव बदलण्याची मागणी
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या मुद्यावर भाष्य केलंय. तसंच आणखी एका शहराचं नाव बदलण्याचंही त्यांनी सुचवलं आहे. पाहा...
मुंबई : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या मुद्यावर भाष्य केलंय. तसंच आणखी एका शहराचं नाव बदलण्याचंही त्यांनी सुचवलं आहे. “औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व अभिनंदन. त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वात होणारच”, असं ट्विट गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पडळकरांनी टॅग केलं आहे.
Published on: Feb 25, 2023 02:31 PM