उत्तर भारतात पाऊसाचा कहर; घग्गर नदीत 25 गायी आणि तीन वासरे अडकली

| Updated on: Jul 10, 2023 | 9:10 AM

उत्तर भारतातील चंदिगड, नवी दिल्ली, हरियाणा भागात पावसाची जोरदार बॅटींग पहायला मिळत आहे. तर जोरदार पावसामुळे अनेक नद्यांचे पाणी हे वाढले असून त्यांचा फटका शेतीला बसत आहे

पंचकुला (हरियाणा) : सध्या उत्तर भारतात पावसाचा हाहाकार पहायला मिळत आहे. उत्तर भारतातील चंदिगड, नवी दिल्ली, हरियाणा भागात पावसाची जोरदार बॅटींग पहायला मिळत आहे. तर जोरदार पावसामुळे अनेक नद्यांचे पाणी हे वाढले असून त्यांचा फटका शेतीला बसत आहे. हरियाणातील पंचकुला येथील घग्गर नदीत पाऊस आणि वेगवान प्रवाह आणि वाढत्या पाण्यामुळे सुमारे 25 गायी आणि तीन वासरे अडकली होती. त्यामुळे अनेकांनी तिकडे धाव घेतली होती. प्रशासनासह स्थानिकांनी गौवन, सेक्टर 23, येथे स्वयंसेवक आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाने बचाव मोहीम राबवली. ज्यामुळे गायी व वासराची सुखरूप सुटका झाली. तर त्या 25 आणि तीन वासरांना गोवन येथे नेण्यात आलं आहे. तर काही तासांतच जोरदार पावसामुळे नदीला वेग आल्याने त्या गाई आणि तीन वासरे नदी पात्रात अडकली होती.

Published on: Jul 10, 2023 09:10 AM
शरद पवार यांची इतक्या वर्षांची साथ का सोडली? दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं बंडाचं कारण…
नाशिक पाठोपाठ आता ‘या’ जिल्ह्यातील पक्ष कार्यालयावरून राष्ट्रवादीतील दोन नेते आमनेसामने